अंदाजे ₹ 550 कोटींच्या मालमत्तेची मालक उर्वशी! पुन्हा बनली सोशल मीडियावर चर्चेचा विषय जानुया संपूर्ण विषय आणि उर्वशी रौतेलाच्या नेट वर्थबद्दल
मनोरंजन डेस्क: उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे कारण तिचा डाकू महाराज हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लेटफॉर्मवरती प्रसारित होणार आहे. परंतु नेटफ्लिक्स वर चित्रपटाच्या पोस्टरमध्ये उर्वशीचा फोटो नसल्यामुळे, लोकांमध्ये अशी अफवा पसरली होती की उर्वशीची भूमिका नेटफ्लिक्सने डिलीट केली आहे, पण तसे काहीही नसून नेटफ्लिक्सने त्यात दुरुस्ती करत,स्ट्रीमिंग दिग्गजांकडून वेगवेगळ्या स्लाइड्स शेअर केल्या आहेत ज्यात उर्वशीचे दोन फोटो दाखवले गेले आहेत.

Urvashi Rautela Net Worth:
सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेलाच्या नेट वर्थबद्दल मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, असे म्हटले जात आहे की तिच्याकडे एकूण 550 कोटींची संपत्ती आहे जी तिला तिच्या चित्रपट कारकीर्द, ब्रँड एंडोर्समेंट, मॉडेलिंग, अभिनय, गिते, जाहिराती, इत्यादी पासून मिळालेली आहे. उर्वशीचे मुंबईतील कोट्यवधींचे घर महागड्या वस्तू आणि पेंटिंग्जने सजवण्यात आले आहे. उर्वशीचे स्वतःचे वैयक्तिक होम जिम देखील आहे ज्यामध्ये लाउंज एरिया आणि सिनेमा हॉल देखील असल्याचे सांगितले जाते. तसेच तिच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शनही पाहायला मिळते. ज्यामध्ये Range Rover, Ferrari, lamborghini, Mercedes, BMW यांन सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे

उर्वशी रौतेला
उर्वशी रौतेलाचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 रोजी झाला, तिने गार्गी कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि सध्या ती भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेलपैकी एक आहे. अनिल शर्मा यांच्या ‘सिंग साब द ग्रेट’ या ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपटातून तिने बॉलिवूड अभिनय करिअरला सुरुवात केली. ती 2012 मध्ये IMC मिस इंडियाची विजेती देखील आहे. तिने विनोदी नाटकांमध्येही तिचे अभिनय कौशल्य दाखवले आहे. तिला 2015 मध्ये मिस दिवा युनिव्हर्स ही पदवी मिळाली, त्यानंतर तिने 2015 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 2021 मध्ये 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी तिला जज म्हणून आमंत्रित केले गेले.

Urvashi Rautela Net Worth
उर्वशी रौतेला नेट वर्थ बद्दल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार, असे म्हटले जाते की तिची एकूण संपत्ती सुमारे 550 कोटी आहे, जी तिला तिच्या फिल्मी करिअर, अभिनय, मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाद्वारे मिळते, असे म्हटले जाते की उर्वशी 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 6 ते 7 कोटी रुपये घेते. तिने मिस टीन इंडिया 2009, मिस एशियन सुपरमॉडेल 2011 आणि मिस टुरिझम क्वीन ऑफ द इयर 2011 सारखी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकली आहेत, ज्यातून तिला चांगले उत्पन्न देखील मिळाले आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर 72 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात, ज्यामुळे ती आज सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री आहे.

Urvashi Rautela Daaku Maharaj Controversy
उर्वशी रौतेला डाकू महाराज वादउर्वशीचा डाकू महाराज हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध होणार आहे, तर स्ट्रीमिंग रिलीजशी संबंधित घोषणेने लोकांना आश्चर्यचकित केले आहे ज्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे तरीही उर्वशीचा फोटो यात दिसत नसल्यामुळे या संबंधित बातम्या सोशल मीडियावर समोर आल्या आहेत, ज्यामध्ये नेटफ्लिक्सने ‘डाकू महाराज’ चित्रपटातील उर्वशी रौतेलाचा सीन रिलीज होण्यापूर्वीच काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे, तथापि, नेटफ्लिक्सने असे काहीही केले नाही आणि हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे अनेक सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ती देखील या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त आहे.

दक्षिण अभिनेता नंदामुरी बालकृष्णाचा डाकू महाराज 12 जानेवारी 2025 हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसला हादरवले. उर्वशी रौतेला आणि बॉबी देओल यांच्याही या मध्ये मुख्य भूमिका आहेत. बॉक्स ऑफिस कमाईच्या आघाडीवर तो यशस्वी ठरल्यानंतर, निर्मात्यांनी OTT म्हणून चित्रपट लाँच करण्याचा निर्णय घेतला. डाकू महाराज या चित्रपटातील उर्वशी रौतेलाला ‘डिबिडी-डिबिडी’ या दमदार गाण्याने खूप चर्चेत आणले होते, चित्रपटातील बालकृष्ण आणि उर्वशीचे हे गाणे खूप लोकप्रिय असून त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यात उर्वशीच्या बोल्ड डान्स मूव्ह्स आहेत.
अश्याच मनोरंजन आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.
धन्यवाद