एन्टरटेनमेंट डेस्क पुणे- आई होण्याचं सुख आणि मोह कोणालाही सुटत नाही यामुळेच बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या फिल्मी करिअरलाही मातृत्व सुखा पेक्षा कमी महत्त्व देत आहेत गेल्या काही वर्षा मध्ये अनेक बॉलिवूड कपल्स विवाह बंधनात अडकले आहेत आणि माता पिता होण्याचं सुखही अनुभवत आहेत.
गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड कलाकार आई बाबा झाले आहेत त्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह, रिचा चड्डा आणि अली फजल, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, यामी गौतम आणि आदित्य धर, वरुण धवन आणि नताशा दलाल असे अनेक कपल्स आहेत ज्यांना आई बाबा होण्याचं सुख मिळालं आहे यातच अजून एका पॉप्युलर जोडीची भर पडली आहे. यंदा त्यांच्याही घरी नटखट कान्हा किंवा गोंडस परी येणार आहे.
kiyara advani & sidharth malhotra
नुकताच बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर ती आई होणार असल्याची गोड बातमी आपल्या फॅन्सला दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून कियारा अडवाणी आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्ध मलोथरा ने त्यांच्या चाहत्यांना ही गुड न्यूज देऊन सरप्राइज दिले आहे.
Caption : The greatest gift of our lives👼Coming soon❤️🧿🙏🏻
सिद्धार्थ मलोथरा आणि कियारा अडवाणी ने आपापल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक खूप गोड असा फोटो पोस्ट केला आहे त्यात सीड आणि की च्या हातामध्ये दोन छोटेसे सॉक्स आहेत आणि खाली The greatest gift of our lives👼Coming soon❤️🧿🙏🏻 असे कॅप्शन लिहिले आहे. त्यांच्या ह्या पोस्ट ला अनेक सेलिब्रिटी ने लाईक आणि कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. करीना कपूर पासून तर आलिया भट्ट पर्यंत सगळ्यांनी त्यांच्या पोस्ट वर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या फॅन्स साठी ही खूप आनंदाची बातमी ठरली आहे. त्यांच्या दोघांच्याही अनेक फॅन्स कडुनही त्यांच्यावर कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन करून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

म्हणाली मला ट्विन्स…..!
काही वर्षा पूर्वी कियारा अडवाणीला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारण्यात आले होते की तुम्हाला ट्विन्स बेबी झाले तर तुम्हाला काय हवे आहे दोन मुले किंवा दोन गोंडस परी त्यावर कियारा ने उत्तर दिले की जर भविष्यात मला ट्विन्स असतील तर मला हेल्थी बेबी हवे आहेत जे देव मला नक्की देतील. त्यानंतर ती म्हणाली की जर मला ट्विन्स असतील तर मला एक मुलगा आणि एक मुलगी हवी आहे एकच वेळी दोन्हीही असतील. तिचा हा इंटरव्ह्यू आता खूप व्हायरल होत असून फॅन्स ला असे वाटत आहे की कियारा अडवाणी ला खरंच ट्विन्स बेबी होणार आहेत. पण अद्यापही कियारा अडवाणी किंवा सिद्धार्थ मलोथरा कडून त्यांना ट्विन्स असल्याचे सांगितले गेलेले नाही.
आई होणार म्हणुन त्यासाठी 1 चित्रपटही सोडला
कियारा अडवाणी आता टॉक्सिक आणि वॉर 2 ची शूटिंग करत आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार कियारा अडवाणी ने आत्ताच एक बिग मुव्ही न करण्याचे ठरवले आहे. कियारा ह्या मूवी पासून स्वःताला वेगळ केलं आहे कियारा ला आता फक्त तिची आणि तिच्या येणाऱ्या बाळाची काळजी घेण्याची आहे म्हणून तिने ही मूवी सोडली आहे. कियारा अडवाणीला सुद्धा बाकी अभिनेत्री सारखे आपली प्रेग्नन्सी एन्जॉय करायची आहे थोडक्यात म्हणायचं झालं तर ती खूप काळजी घेत आहे. सिद्धार्थ मलोथरा सुद्धा कियारा ची खूप काळजी घेतात. कियारा अडवाणी ने ‘डॉन 3’ ही मूवी सोडली आहे. ह्या मूवी मध्ये रणवीर सिंग लीड रोल मध्ये दिसून येणार आहे ही मूवी फरान अख्तर बनवत आहे. ‘डॉन 2’ साठी आता नवीन अभिनेत्री शोधत आहे. लवकरच लीड रोल मध्ये रणवीर सिंग सोबत कोण दिसून येणार आहे हे आपल्याला समजेल.

२०२५ मध्ये फक्त कियारा अडवाणीच नाही तर सुनील शेट्टी ची मुलगी बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी, साऊथ आणि बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ, बॉलीवूड अभिनेत्री इशिता दत्ता ह्याही अभिनेत्रींना आई होण्याचं सुख मिळणार आहे.
अश्याच मनोरंजन आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.