विकी कौशलने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण पहिल्यांदाच आपल्याला विकीला वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाला. त्याच्या नवीन चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसून आला. प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाचे फार कौतुक केले.

पहिल्यांदाच, विकी त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळे घेऊन आला आहे. आणि चाहत्यांना त्याचा अभिनय देखील खूप आवडला आहे. छावा चित्रपटाच्या यशानंतर लगेच विकी कौशलची 2026 मध्ये ‘love and war‘ हा सिनेमा प्रदर्शित होणार असून लगेच वर्षाच्या शेवटी ‘महाअवतार‘ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

विकी कौशल चित्रपट कारकिर्दीत
आतापर्यंत विकीने मनमर्जियां, लव्ह पर स्क्वेअर फूट, रमन राघव २.०, जुबान, मसान, बॉम्बे वेल्वेट, लव शव ते चिकन खुराना, राजी, संजू, लस्ट स्टोरीज, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, भूत: पार्ट वन – द हॉन्टेड शिप, सरदार उधम, गोविंदा नाम मेरा, जरा हटके जरा बचके अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेले उरी: द सर्जिकल स्ट्राईक आणि २०२१ मध्ये प्रदर्शित झालेले सरदार उधम हे चित्रपट चाहत्यांना खूप आवडले. या दोन्ही चित्रपटांमध्ये विकीने आपल्या देशाबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.विकी कौशलला त्याच्या कामासाठी आतापर्यंत २८ पुरस्कार मिळाले आहेत. विकीला ३ आयफा पुरस्कार मिळाले; त्याचा पहिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार २०१६ च्या ‘मसान’ चित्रपटासाठी होता. नंतर, २०१९ मध्ये संजू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि विकीला २०२२ मध्ये सरदार उधम चित्रपटासाठी पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. विकीच्या आयुष्यातील सर्वोत्तम चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक‘ होता. या चित्रपटासाठी त्याला ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटातून विकीला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली, लोकांनी चित्रपटातील विकीच्या कामाचे कौतुक केले आणि तेव्हापासून विकीने कधीही त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही.

चाहत्यांसाठी नवीन संकल्पनांवर काम
विकी नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटांमध्ये नवीन संकल्पनांवर काम करतो. विकीने बहुतेक रोमँटिक कॉमेडी आणि एक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. विकीच्या उरी: द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटात, विकीने एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. विकीच्या ‘मेरा नाम गोविंदा’ या चित्रपटात विकीने एका रोमँटिक बॉयफ्रेंड आणि एका त्रासलेल्या पतीची भूमिका साकारली आहे, ज्यामध्ये विकीने रोमँटिक कॉमेडी चित्रपट देखील केले आहेत हे आपल्याला समजते.


प्रदर्शित होणार विकी कौशलचे हे 2 चित्रपट
संजय लीला भन्साली ह्यांनी ‘love and war’ हा सिनेमा दिनदर्शित केला आहे. गंगूबाई काठीयावाडी हा संजय लीला भन्साली यांचा शेवटचा सुपर हिट सिनेमा ठरला होता गंगूबाई काठीयावाडी नंतर त्यांनी ‘love and war‘ सिनेमा वर काम केले. ह्या सिनेमात विकी कौशल सोबतच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. हा सिनेमा २०२६ मध्ये येणार असल्याची घोषणा २०२४ मध्येच करण्यात आली असून ह्याची शूटिंग सुद्धा सुरू झाली आहे. ह्या सिनेमाचे बरेचसे भाग शूट झाल्याचे सूत्रांकडुन समजले आहे. तसेच, महाअवतार हा सिनेमा अमर कौशिक यांनी दिनदर्शित केला असून हा चित्रपट सुद्धा २०२६ च्या डिसेंबर पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेही समजले आहे की विकीने राजकुमार ईरानी सोबतही एक मूवी साइन केली आहे पण त्याचे नाव अजून समजले नाही.
The story of Chiranjeevi Parashurama the eternal warrior of dharma! – Mahavatar
तसेच चिरंजीवी परशुरामांची कहानी असलेला महाअवतार हा पौराणिक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिरंजीवी परशुराम यांची भूमिका साकारलेला विकीचा हा चित्रपट एक्शन आणि एडवेंचर ने भरलेला असणार आहे. जी की चिरंजीवी परशुरामांची जीवनगाथा- धर्माचा अखंड योद्धा अशी असणार आहे.
