2025 ची ही मूवी ठरली blockbuster…
2025 चा blockbuster ठरला छावा…
एन्टरटेनमेंट डेस्क पुणे- ह्या वर्षातली छावा ही पहिलीच मूवी आहे आणि पहिल्याच मूवी ने बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय 2025 ची सर्वात जास्त कमाई करणारी विकी कौशल ची छावा मूवी ठरली आहे. छावा मूवी ही रिलीज होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत तरीही थिएटर हाऊसफुल दिसत आहेत. बॉलीवूड च्या अनेक हिट मूवी चे रेकॉर्ड छावा ने तोडून टाकले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर असलेल्या ह्या ऐतिहासिक सिनेमा ने प्रेक्षकांना वेड लावले आहे. भारतात छावा मूवी ने स्वतःचा एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. छावा चित्रपटाला तीन आठवडे पूर्ण झाले असून आता पर्यंत छावा चित्रपटाची कमाई 500 कोटी च्या घरात पोहचली आहे.

Chhava box office collection अवघ्या 22 व्या दिवशी फिल्म ची कमाई
अवघ्या 22 व्या दिवशी फिल्म ची कमाई 500 कोटी पर्यंत पोहचली आहे. सगळी कडे फक्त आणि फक्त छावा चित्रपटाचाच क्रेझ दिसून येत आहे. छावा मूवी चे आता पर्यंत चे वर्डवाइड कलेक्शन पहायचे म्हटले तर 650 कोटी च्या पुढे गेले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण दुनियाभरात छावा ने आता पर्यंत 682.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

विकी कौशलचे होत आहे सर्वत्र कौतुक
विकी कौशलने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण पहिल्यांदाच आपल्याला विकीला वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाला. त्याच्या नवीन चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसून आला. प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे फार कौतुक केले.

विकी कौशल ची चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी
विकी कौशलला त्याच्या कामासाठी आतापर्यंत २८ पुरस्कार मिळाले आहेत. विकीला ३ आयफा पुरस्कार मिळाले; त्याचा पहिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार २०१६ च्या ‘मसान’ चित्रपटासाठी होता. नंतर, २०१९ मध्ये संजू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि विकीला २०२२ मध्ये सरदार उधम चित्रपटासाठी पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. विकीच्या आयुष्यातील सर्वोत्तम चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ होता. या चित्रपटासाठी त्याला ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटातून विकीला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली, लोकांनी चित्रपटातील विकीच्या कामाचे कौतुक केले आणि तेव्हापासून विकीने कधीही त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही.

चाहत्यांसाठी चित्रपटांमध्ये नेहमीच नवीन संकल्पनांवर काम करतोय विकी
विकी नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटांमध्ये नवीन संकल्पनांवर काम करतो. विकीने बहुतेक रोमँटिक कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. विकीच्या उरी: द सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे, विकीने एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. विकीच्या ‘मेरा नाम गोविंदा’ या चित्रपटात विकीने एका रोमँटिक बॉयफ्रेंड आणि एका त्रासलेल्या पतीची भूमिका साकारली आहे, ज्यामध्ये विकीने रोमँटिक कॉमेडी चित्रपट देखील केले आहेत हे आपल्याला समजते.

मूवी रोज बनवतीय नवीन रेकॉर्ड
विकी कौशल आणि रश्मिका मंदना ह्यांची छावा ही मूवी रोज नवीन रेकॉर्ड बनवत चालली आहे. विकी चा छावा हा सिनेमा तेलगू भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. जबरदस्त ऍक्शन,उत्तम अभिनय, आणि हृदयाला पिळवटून टाकणारा क्लायमॅक्स असणाऱ्या ह्या मूवी ने तेलगू भाषेत प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी २ कोटी ५० लाख इतकी कमाई केली हे कलेक्शन जास्त नाही परंतु ही मूवी तेलगू मध्ये प्रदर्शित केल्या मुळे ह्या मूवी चा कलेक्शन ग्राफ थोडा वरती नक्कीच गेला आहे. निर्देशक लक्ष्मण उटेकर द्वारा बनवलेली ही फिल्म लोकांना फारच आवडली आहे.

मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक
ह्या सिनेमाने अनेक मोठ मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले. चित्रपटाच्या ५ पट अधिक कमाई छावा ने केली आहे. छावा ही मूवी अजूनही हाऊसफुल ठरत आहे त्यामुळे आता ती नक्की कोणता उच्चांक गाठते हे पाहण्यासारख ठरेल.
अश्याच मनोरंजन विश्वातील आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.