Athiya Shetty and K.L.rahul’s Pregnancy Photoshoot 2025 – अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट के एल राहुल यांचे क्यूट रोमँटिक फोटो आले समोर…
Athiya Shetty and K.L.rahul good news 2025 –

एंटरटेनमेंट डेस्क पुणे- 90’s च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी ही सध्या प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे.अथिया शेट्टी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर बेबी बंप चे फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये ooh baby अस म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री अथिया आणि भारतीय क्रिकेट के एल राहुल यांचे क्यूट रोमँटिक फोटोही समोर आले आहेत.

अथिया शेट्टी फिल्म्स
अथिया शेट्टी ची फिल्म जर्नी खुप जास्त अशी मोठी नाही. परंतु तिने 2015 मध्ये 90’s च्या प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोली यांच्या मुलगा सूरज पांचोली सोबत ‘हिरो ‘ ह्या आपल्या पहिल्या मूवी मध्ये काम केले. सूरज पांचोली यांचीही हिरो ही पहिलीच मूवी होती. ह्या सिनेमा साठी अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली ला स्टारडस्ट अवॉर्ड्स मध्ये बेस्ट जोडी ऑफ द इयर हा अवॉर्ड देखील मिळाला. त्यानंतर प्रोडसर्स गिल्ड फिल्म अवॉर्ड्स मध्ये मोस्ट प्रॉमिसिंग डेब्युट जोडी हा अवॉर्ड मिळाला. त्याच बरोबर इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स (IIFA) मध्ये हॉटेस्ट पेअर हा अवॉर्ड मिळाला. अथिया शेट्टी चे सूरज पांचोली पासून तर अर्जुन कपूरशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू होत्या पण त्या फक्त अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर तिची 2017 मध्ये मुबारका ही फिल्म रिलीज झाली. तसेच 2018 मध्ये नवाबजादे ह्या मूवी मध्ये अथिया शेट्टी ने तेरे नाल नचना हे साँग केली. पुढे 2019 मध्ये तिची मोतीचूर चकनाचूर ही मूवी आली. त्यानंतर अथिया शेट्टी ने कोणत्याही फिल्म मध्ये काम केले नाही.
Athiya Shetty and K.L.rahul marriage

अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल या दोघांनीही सोशल मीडिया द्वारे छोट्याशी पोस्ट शेअर करत आपण रिलेशन मध्ये असल्याचे फॅन्स ना सांगितले. त्यानंतर 23 जानेवारी 2023 रोजी दोघांनी अथिया शेट्टी चे वडील अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या फॉर्म हाऊस मध्ये लग्न गाठ बांधली.

अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल प्रेगन्सी जर्नी Athiya Shetty and K.L.rahul’s Pregnancy Photoshoot

अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक प्रेमळ पोस्ट शेअर करत प्रेग्नन्सी ची अनाउन्समेंट केली. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की “Our beautiful blessing is coming soon.”
आता काही दिवसांपूर्वी 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफी च्या फायनल सामन्या मध्ये जेव्हा भारताचा विजय झाला तेव्हा अख्ख्या भारतात जल्लोषाचे वातावरण होते सगळे लोक टीम इंडिया ला शुभेच्छा देत होते. अथिया शेट्टी ने देखील टीव्ही च्या समोर उभे राहून टीम इंडिया ला शुभेच्छा दिल्या. याचा फोटो तिने शेअर केला ज्यामध्ये के एल राहुल टीव्ही मध्ये दिसत असताना बेबी बंप सोबत ती उभी असल्याचा तिचा फोटो आहे. आणि तिने के एल राहुल ला देखील इथे टॅग केले होते आणि दुसऱ्या फोटो मध्ये टीम इंडिया ला शुभेच्छा दिल्या होत्या.

अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूट…

अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर बेबी बंप सोबत एक क्यूट रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. अथिया शेट्टी ने फोटो सोबतच कॅप्शन मध्ये ‘ooh baby ‘ अस लिहून येणाऱ्या बाळावर आपले प्रेम व्यक्त केले आहे. त्यात दोघेही खूप खुश दिसत आहेत. अथिया शेट्टी सध्या तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करताना दिसून येत आहे.
अश्याच मनोरंजन विश्वातील आणि इतर बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.