Bollywood actor is dating Sreeleela ? बॉलिवुड अभिनेता आणि साऊथ च्या हिरोईन श्रीलीला या दोघांमध्ये नक्की काय……IIFA अवॉर्ड्स 2025 च्या रात्री अभिनेत्याच्या आईने केला रिलेशन बद्दलचा खुलासा

Bollywood actor is dating Sreeleela ? बॉलिवुड अभिनेता आणि साऊथ च्या हिरोईन श्रीलीला या दोघांमध्ये नक्की काय……

एंटरटेनमेंट डेस्क पुणे: साऊथ अभिनेत्री श्रीलीला आणि बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत.ह्या अफवा सत्य आहेत की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण काही दिवसांपूर्वी IIFA अवॉर्ड्स च्या रात्री कार्तिक आर्यन च्या आईने त्या दोघांच्या रिलेशन बद्दलचा खुलासा केला आहे.

Bollywood actor is dating Sreeleela? बॉलिवुड अभिनेता आणि साऊथ च्या हिरोईन श्रीलीला या दोघांमध्ये नक्की काय......
Bollywood actor is dating Sreeleela ? Image source instagram

Who is ShreeLeela ?

Bollywood actor is dating Sreeleela ? Image source instagram

श्रीलीला ही एक साऊथ आणि कन्नड अभिनेत्री आहे. तिचा जन्म अमेरिकेत झाला आहे परंतु ती भारतातच राहते. तिनी अनेक साऊथ आणि कन्नड मूवी मध्ये काम केले आहे. अल्लू अर्जुन ची सुपरहिट मूवी ‘पुष्पा 2 ‘ मध्ये ‘किस्सिक ‘ ह्या गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा डान्स परफॉर्मन्स फॅन्स ना खूप आवडला. श्रीलीला आता बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोबत एक नवीन मूवी मध्ये काम करत आहे.

कार्तिक आर्यन फिल्म्स

Bollywood actor Kartik Aaryan Image source instagram

कार्तिक आर्यन ने 2011 मध्ये प्यार का पंचनामा ह्या मूवी मधून फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2013 मध्ये आकाश वाणी, 2014 मध्ये कांची, त्यानंतर 2015 मध्ये त्याच्या पहिल्या फिल्म प्यार का पंचनामा चा दुसरा पार्ट रिलीज करण्यात आला ‘प्यार का पंचनामा 2’ नंतर 2017 मध्ये गेस्ट इन लंडन ही मूवी आली. 2018 मध्ये ‘सोनू की टीटू की स्विटी ‘ 2019 मध्ये त्याच्या दोन फिल्म्स रिलीज झाल्या एक ‘लुका छुपी ‘ आणि दुसरी ‘पती पत्नी और वो ‘ 2020 मध्ये लव आज कल ही सारा अली खान अपोझिट अँक्टर होती त्या मूवी च्या रिलीज नंतर कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत असल्याच्या ही चर्चा सुरु होत्या. पण मूवी च्या रिलीज नंतर दोघांचे ब्रेकअप झाले ब्रेकअप झाल्याचे कारण सूत्रांच्या माहितीनुसार कार्तिक आर्यन ची ‘दोस्तांना 2 ‘ ह्या फिल्म मध्ये काम करत असताना त्याचे नाव जान्हवी कपूर सोबत जोडले गेले होते परंतु ही मूवी बनवली गेली नाही. नंतर 2021 मध्ये ‘धमाका ‘ ही मूवी आली 2022 मध्ये कार्तिक आर्यन ची सुपरहिट मूवी ‘भूल भुलैया 2 ‘ आली. भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यन ने ‘रुह बाबा ‘ ची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना फार आवडली. त्यानंतर 2024 मध्ये ह्याच मूवी चा तिसरा भाग भूल भुलैया 3 आला. त्यामध्येही कार्तिक आर्यन ने रुह बाबा ची भूमिका साकारली होती आणि रूह बाबा सोबतच ह्या वेळी मोनजुलिका नाही तर एक राजकुमार भूत म्हणून त्याचीही भूमिका कार्तिक आर्यन ने साकारली होती. त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना ही मूवी खूप आवडली आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. सत्यप्रेम की कथा , फ्रेडी , शहजादा, चंदू चॅम्पियन अशा अनेक चित्रपटात कार्तिक आर्यन ने काम केले आहे.

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला new movie

Bollywood actor Kartik Aaryan Image source instagram

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांची एक नवीन मूवी येणार असल्याची घोषणा झालेली आहे. ही फिल्म अनुराग बसू बनवत आहे. ही एका अतिशय रोमँटिक मूवी आहे जिचे नाव पहिले आशिकी 3 अस ठेवण्यात आलं होतं परंतु हे नाव नसल्याचे सूत्रांकडून समोर आलं आहे. मूवी चे टायटल अजून समोर आलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ह्या चित्रपटासाठी अनुराग बसू यांची तृप्ती डिमरी ही पहिली पसंद होती परंतु काही कारणामुळे त्यांनी तृप्ती डिमरी च्या जागी श्रीलीला ला फिल्म मध्ये घेतले.
श्रीलीला ची ही दुसरी बॉलीवूड मूवी आहे.

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला अफेयर रूमर्स

Bollywood actor is dating Sreeleela ? Image source instagram

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन च्या बहिणी साठी एक पार्टी ठेवण्यात आली होती त्या पार्टी मध्ये श्रीलीला दिसून आली. श्रेलीला ही कार्तिक आर्यन च्या परिवारात खूप मिसळून एन्जॉय करत असल्याचे दिसून आले. आणि त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या पण कार्तिक आर्यन आणि श्रीलीला ने ह्यावर कोणतेच ऑफिसिअल अनाउन्समेंट केली नाही पण आता कार्तिक आर्यन च्या आईने ८ मार्च रोजी जयपूर मध्ये झालेल्या IIFA अवॉर्ड्स मध्ये दोघांच्या रिलेशनशिप बद्दल कॉन्फर्मेशन दिले आहे. IIFA अवॉर्ड मध्ये कार्तिक आर्यन च्या आईला प्रश्न विचारण्यात आला की त्यांना काही सुन हवी आहे. तर त्यांनी उत्तर दिले की ‘ मला एक उत्तम डॉक्टर असलेली सुन हवी आहे ‘ त्यावरून फॅन्स ने अंदाज लावला आहे की श्रीलीला आणि कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत आहेत. कारण श्रीलीला अक्टिंग सोबतच डॉक्टर चा ही स्टडी करत आहे. पण अजून दोघांकडूनही त्यांच्या रिलेशन बद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही.

अश्याच मनोरंजन विश्वातील आणि इतर बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.

Leave a Comment