Bollywood’s old romantic love birds – बॉलीवूड चे old रोमँटिक लव बर्ड्स ब्रेकअप च्या 18 वर्षा नंतर आले एकत्र…दोघांनी घेतली गळाभेट ……

Bollywood’s old romantic love birds

Bollywood’s old romantic love birds – बॉलीवूड ची सगळ्यात आवडती जोडी म्हटलं तर सगळ्यात आधी करीना कपूर आणि शहीद कपूर ह्या जोडी चे फोटो डोळ्या समोर येतात. 2024 मध्ये झालेल्या IIFA अवॉर्ड्स मध्ये शहीद कपूर मिडिया शी संवाद साधत होते तेव्हाच करीना कपूर तेथे आली होती. करीना कपूर ने शहीद कपूर ला पाहूनही न पाहिल्यासारखे केले. करीना ने शहीद ला इग्नोर केल्या मुळे गेल्या वर्षी दोघेही सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले होते. असाच काहीस ह्या वर्षीच्या IIFA अवॉर्ड्स मध्ये झाले आणि पुन्हा एकदा शहीद आणि करीना चर्चेचा विषय बनले आहेत.

Bollywood's old romantic love birds
(फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम) Bollywood’s old romantic love birds

Shahid Kapoor and Kareena Kapoor Khan

शहीद कपूर आणि करीना कपूर हे दोघे 2004 मध्ये आलेल्या ‘फिदा ‘ फिल्म च्या सेटवर एकमेकांना भेटले अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शहीद कपूर हे ह्या मूवी चे लीड रोल अँक्टर्स होते. करीना कपूर ने शहीद कपूर ला पाहिल्यावर तिला वन साइड लव झाले आणि मूवी ची शूटिंग चालू असतानाच करीना कपूर ने शहीद कपूर ला प्रपोस केले पण शहीद कपूर ह्या रिलेशनशिप साठी तयार नव्हता. करीना कपूर ने खुप एस एम एस आणि फोन कॉल करून करून शहीद कपूर ला स्वतःच्या प्रेमात पाडले आणि दोघांची लव स्टोरी सुरू झाली.करीना कपूर ने शहीद कपूर साठी नॉनव्हेज सुद्धा खायचे सोडले होते. त्यानंतर दोघांनी बॉलीवूड ला अनेक हिट मूवी दिल्या.

करीना कपूर आणि शहीद कपूर फिल्म्स

करीना कपूर आणि शहीद कपूर यांची सोबतची सगळ्यात पहिली 2004 मध्ये आलेली फिदा ही मूवी आहे. त्यानंतर दोघांची जोडी फॅन्स ला खूप आवडली. 2006 मध्ये दोघांच्या दोन फिल्म्स आल्या ‘चूप चूप के ‘ आणि ’36 चायना टाऊन’ ह्या मूवी ही फॅन्स ना खूप आवडल्या. त्या नंतर 2007 साली त्याची सुपरहिट मूवी ‘जब वी मेट ‘ ही आली. ह्या मूवी च्या रिलीज नंतर दोघांचे फॅन्स त्यांना मूवी च्या कॅरेक्टर्स आदित्य आणि गीत च्या नावाने बोलू लागले. त्यानंतर ‘मिलेंगें मिलेंगें ‘ ‘उडता पंजाब ‘ सारख्या फिल्म्स मध्ये दोघे दिसून आले.

शहीद कपूर आणि करीना कपूर ब्रेकअप

2004 मध्ये फिदा फिल्म पासून शहीद कपूर आणि करीना कपूर ची लव स्टोरी सुरू झाली होती. त्यानंतर 2007 मध्ये आलेल्या सुपरहिट मूवी जब वी मेट नंतर ह्या प्रेमळ आणि रोमँटिक लव स्टोरी चा ब्रेकअप झाला. त्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही पण रुमर्स आहेत की करीना कपूर च्या आई बबिता कपूर ला शहीद कपूर आवडत नव्हते आणि त्यात जेव्हा शहीद आणि करीना कपूर ची 2007 मध्ये ‘जब वी मेट ‘ फिल्म चालू होती तेव्हा करीना ने ‘टशन ‘ ही मूवी साइन केली आणि ‘टशन ‘ मूवी च्या शूटिंग दरम्यान सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर एकत्र आले. त्यानंतर शाहिद आणि करीना कपूर च्या ब्रेकअप च्या न्यूज सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यावर कोणताच ऑफिसिअल अनाउन्समेंट झाली नसताना 2012 मध्ये करीना कपूर ने सैफ अली खान सोबत लग्न केले आणि 2015 मध्ये शहीद कपूर ने सुद्धा मीरा राजपूत सोबत लग्न गाठ बांधली. आता करीना कपूर खान ला तैमूर आणि जेह अली खान अशी दोन मुले आहेत. तसेच शहीद कपूर ला मिशा ही मुलगी आहे आणि झैन हा मुलगा आहे.

(फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

2004 मध्ये सुरू झालेली दोघांची लव स्टोरी अखेर 2007 मध्ये संपली पण म्हणतात ना love is never end ह्या वर्षी जयपूर मध्ये झालेल्या IIFA अवॉर्ड्स मध्ये शहीद आणि करीना पुन्हा एकदा पहिल्या सारखे एकत्र दिसले. दोघांनी एकमेकांना मिठीही मारली आणि दोघांमध्ये अजूनही मैत्रीचे नाते असल्याचे दिसून येत आहे. त्या दोघांना सोबत पासून आदित्य आणि गीत च्या फॅन्स ना ‘जब वी मेट 2 ‘ येण्याची आशा वाटत आहे.

अश्याच मनोरंजन आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.

Leave a Comment