Brekup in bollywood 2025 : बॉलीवूड मध्ये आणखी एक सुप्रसिद्ध जोडी झाली वेगळी…लग्न करणार असल्याच्या चर्चा आणि अचानक ब्रेकअप

Brekup in bollywood 2025

एन्टरटेनमेंट डेस्क पुणे- बॉलीवूड ची सगळ्यात प्रेमळ जोड्या पैकी एक असलेली तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ची जोडी खरंच वेगळी झाली असेल का ? त्यांचचा ब्रेकअप झाला असल्याची चर्चा सध्या खूप व्हायरल होत आहेत त्यामुळे त्यांचे फॅन्स ना खूप आचार्याचा धक्का बसला आहे. नक्की त्यांच्या ब्रेकअपच काय कारण असू शकतं ? तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लग्न करणार असल्याचे बोलण्यात येत होते आणि अस काय झालं असावं की अचानक ब्रेकअप झाला. नक्की ब्रेकअप झालाय की ही फक्त अफवा आहे. चला तर मग जाणून घेवुयात
Brekup in bollywood image source instagram
Brekup in bollywood image source instagram

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि बॉलीवूड अभिनेता विजय वर्मा

साऊथ सोबतच बॉलीवूड मध्येही फेमस असलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि बॉलीवूड अभिनेता विजय वर्मा ह्या दोघांची जोडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. बॉलीवूड कपल्स मध्ये जर कोणाचा ब्रेकअप झाला किंवा पॅचप झाला तरी सगळ्यात अगोदर हे सोशल मीडियाद्वारे फॅन्स ना समजत हे असाच काहीस ह्या जोडी सोबत सुद्धा झाल असावं.

Brekup in bollywood image source instagram
Brekup in bollywood image source instagram

तमन्ना भाटिया फिल्मी करियर

तमन्ना भाटिया शेवटची ‘सिकंदर का मुकद्दर’ या गुन्हेगारी नेटफ्लिक्स वेबसीरिजमध्ये काम केले होते. नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केली आहे असून त्यात अविनाश तिवारी, जिमी शेरगिल, राजीव मेहता, दिव्या दत्ता आणि झोया अफरोज सारखे कलाकार आहेत. याशिवाय, ती 2024 मध्ये ‘अरणमलई 4’ आणि ‘वेदा’ सारख्या चित्रपटांतही तिने काम केले आहे. तसेच 2024 मध्ये, तिच्या दमदार अभिनयासोबतच, तमन्नाने तिच्या उत्कृष्ठ नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. ती ‘स्त्री 2’ चित्रपटातील ‘आज की रात’ या गाण्यात दिसून आली, ज्या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला प्रत्येक ठिकाणी त्याचा बोलबालाही झाला, ज्यामध्ये तिचा अभिनयही लोकांना खूप आवडला. आता २०२५ मध्ये ती ‘ओडेला 2’ या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये तमन्ना एका नागा साधूच्या अवतारात दिसत आहे. हा टीझर महाकुंभ मेळ्यात लाँच करण्यात आला होता. त्याबद्दल देखील सोशल मीडियावरती खुप चर्चा झाली.

विजय वर आपले किती प्रेम आहे हे दाखवून देण्यासाठी विजय च्या नावाचा टॅटू

Brekup in bollywood image source instagram instantbollywood official

Tamannaah bhatiya and Vijay varma तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ला खूप ठिकाणी एकत्र झाले स्पॉट

लस्ट स्टोरी 2 नंतर दोघांची जोडी खूप चर्चेत आली होती. त्यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ला खूप ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले. त्या दोघांना सोबत पाहून चाहत्यांनी ते दोघे रिलेशन मध्ये असल्याची चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी तमन्ना ने विजय वर आपले किती प्रेम आहे हे दाखवून देण्यासाठी विजय च्या नावाचा टॅटू ही आपल्या हातावर काढला होता. खरं तर टॅटू सोबतचा फोटो व्हायरल झाल्या पासूनच दोघांच्या लव अफेअरच्या अफवाना खारेपणा आला. आणि दोघांनीही आपल्या रिलेशनशीप ची कबुली दिली. तेव्हा पासून फॅन्स त्या दोघांना ‘दो हंसो का जोडा ‘ म्हणून बोलू लागले. पण आता ही जोडी वेगळी झाली आहे हे त्यांच्या फॅन्स ना दिसून येत आहे.

लवकरात लवकर लग्न बंधनात अडकण्याची तयारी करत होती

Brekup in bollywood image source instagram

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तमन्ना भाटिया विजय वर्मा सोबत लवकरात लवकर लग्न बंधनात अडकण्याची तयारी करत होती परंतु विजय अजून ह्या साठी तयार नव्हता त्यांच्या कडे मूवी चे अजून खूप सारे प्रॉजेक्ट होते म्हणून दोघांनीही असलेले त्यांचे संबंध संपून फक्त एक चांगले मित्र म्हणून राहण्याचे ठरवले. असे सांगण्यात येत आहे तमन्ना आणि विजय या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे.आणि दोघांनीही एकमेकांन सोबतचे आपले फोटो डिलिट केले आहेत. यामुळे या दोघांचा खरंच ब्रेकअप झाल्याच चाहते म्हणत आहेत. पण अजूनही तमन्ना भाटिया किंवा विजय वर्मा या दोघांकडूनही ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात आलेलं नाही त्यांनी अद्याप ह्या गोष्टींवर कोणतंही भाष्य केलेलं नाही. पंरतु हे त्यांच्या चाहत्यांना खुप संभ्रमात टाकत आहे.

Brekup in bollywood image source instagram

अश्याच मनोरंजन आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.

Leave a Comment