Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पाहायला मिळाला चढ, चांदीच्या किमतीचाही वाढला भाव. पहा आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत? 24 k gold

मुंबई: इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या भाव निर्देशांकानुसार, 03 मार्च 2025 तुलनेत आज 04 मार्च 2025, भारतात सोन्याची किंमत वाढली आहे. तसेच चांदीच्या किमतीत देखिल भाव वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

Gold Rate Today.

भारत हा सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध देश आहे आणि सण आणि विवाहसोहळ्यांमध्ये सोन्याला खूप महत्त्व असते. दिवाळी, धनत्रयोदशी, अक्षय्य तृतीया आणि लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणी वाढते. या काळात मागणी वाढल्याने सोन्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी भाववाढ झालेली दिसून येत आहे. परंतु सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असलेल्यामुळे महागाई असतानाही सोन्याला मोठी मागणी कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात खुप मोठी वाढ झाली आहे. सोने महाग झाले असले तरी मागणी कमी झालेली नाही. त्यामानाने आज सोन्या-चांदीच्या भावात तेजी दिसुन आली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज 04 मार्च रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 85,817 रुपये झाला आहे. आणि प्रति ग्रॅम 8582 रुपये आहे तसेच, 22 कॅरेट सोन्याची किंमत 78,608 रुपये इतका आहे तर प्रति ग्रॅम 7860 रुपये आहे. चांदीचा भावही जवळपास 94,873 रुपये आहे.
Gold Rate Today image source Pinterest
Gold Rate Today image source Pinterest
Gold Rate Today image source ibjrates.com

देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे भाव

शहर 24 कॅरेट 1 ग्राम सोने 22 कॅरेट 1 ग्राम सोने 18 कॅरेट 1 ग्राम सोने
पुणे 873880106554
मुंबई 873880106554
नवी दिल्ली 875380256566
जयपुर 875380256566
Gold Rate Today image source Pinterest

सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम गुंतवणूकीचा पर्याय –

अनेकांना सोन्याचे दागिने आवडतात आणि बहुतेकजण दागिने खरेदी करणे ही गुंतवणूक म्हणून पाहत नसले तरी गरजेच्या वेळी ही एक योग्य मालमत्ता असू शकते. लोक सोन्यात गुंतवणूक करणे ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानतात. हा एक उत्तम पर्याय आहे ज्याने नेहमीच चांगला परतावा दिला आहे. कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आणि हे तुम्हाला आणि तुमच्या गुंतवणुकीला एक निश्चित सुरक्षा प्रदान करते. सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्ही ते कोणत्याही कारणास्तव विकत घेत असाल तर तुम्हाला त्याच्या योग्य किमतीबद्दल निश्चित माहिती असली पाहिजे.सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानली जाते कारण यामध्ये गुंतलेले जोखीम घटक खूपच कमी असतात आणि त्याला नेहमीच मागणी असते. सोन्यात गुंतवणुकीचे बरेच मार्ग आहेत, जे हातात असलेले पैसे आणि गरजा यावर अवलंबून आहेत.
Gold Rate Today image source ibjrates.com

ॲलोकेटेड गोल्ड अकाऊंट-

ज्यांना सोने घ्यायचे आहे परंतु ते त्यांच्याकडे ठेवण्यास उत्सुक नाहीत त्यांच्यासाठी ॲलोकेटेड गोल्ड अकाऊंट (वाटप केलेल्या सोन्याच्या खात्यांद्वारे) सोन्यात गुंतवणूक करणे हा एक स्मार्ट पर्याय असू शकतो. ज्या बँका हे खाते ऑफर करतात ते सोने त्यांच्याकडे ठेवतील आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते मालकाला मिळू शकेल.
सोन्याची शुद्धतेचे वर्गीकरण – सोन्याचे शुद्धतेच्या आधारे अनेक स्तरांमध्ये वर्गीकरण केले जाते. सर्वात सामान्य आहेत 24 कॅरेट, (99.9% आणि त्याहून अधिक), 22 कॅरेट (92% शुद्ध), 18 कॅरेट (75% शुद्ध आणि 14 कॅरेट (58.33% शुद्ध) सोने. 24 कॅरेट सोने हे मौल्यवान धातूचे शुद्ध स्वरूप मानले जाते. 24 कॅरेट अतिशय ठिसूळ असल्याने त्यांच्यावर जर नक्षीकाम केले अथवा त्यापासून दागिने तयार करताना ते सहजपणे तुटण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून, ज्वेलर्सद्वारे 24 कॅरेट सोन्यापेक्षा 22 कॅरेट सोन्याची निवड केली जाते, जेणेकरून ते त्याच्या गरजेनुसार वैयक्तिकृत डिझाइन तयार करतात.

सोने खरेदी करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा-

नेहमी हॉलमार्क केलेले सोने आणि चांदी खरेदी करा. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्वप्रथम त्यावर सहा क्रमांकाचे चिन्ह आहे की नाही ते तपासा. दागिने खरेदी करताना, मेकिंग चार्जबद्दल जाणून घ्या. नियमानुसार कोणताही दुकानदार BIS हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही. हॉलमार्क सोने आणि चांदीच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. नेहमी मूळ बिल घ्या. सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता.
अश्याच फायनान्स आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.

अस्वीकरण: या पृष्ठावरील सोन्याच्या किमती स्थानिक प्रतिष्ठित दागिन्यांची दुकाने आणि सोनारांकडून मिळवल्या गेल्या आहेत. तसेच ibjarates.com ह्या अधिकृत वेबसाइट वरुण मिळवले गेले आहेत. किमतीत किंचित तफावत शक्य आहे. Prabhatnewsindia.com तुम्हाला सोन्याच्या अचूक किमती देण्याचा नेहमीच प्रयत्न करते. परंतु किंमती अचूक असल्याची हमी देत ​​नाहीत. सोन्याचे भाव येथे फक्त माहिती म्हणून दिले जात आहेत. हे तुम्हाला सोने खरेदी किंवा विक्री करण्यास प्रेरित करण्यासाठी पाठवले जात नाहीत. उद्धृत केलेल्या सोन्याच्या किमतींमुळे कोणतेही नुकसान किंवा नुकसान झाल्यास, Prabhatnewsindia.com जबाबदार नाहीत.

Leave a Comment