Indian cricketer पडलाय पुन्हा प्रेमात? 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफी च्या फायनल सामन्यात RJ महवश आणि इंडियन क्रिकेटर दिसून आले एकत्र…..! वाइफ सोबतच्या डिव्होर्स नंतर फोटो आले समोर अफवा की सत्य…

Indian cricketer पडलाय पुन्हा प्रेमात? : भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल धनश्री वर्मा सोबत डिव्होर्स झाल्या नंतर आता RJ महवश ला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफी च्या फायनल सामन्या मध्ये युझवेंद्र चहल आणि RJ महवश हे दोघे एकत्र दिसून आले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत की काय असाच त्यांना पाहून वाटत होते. धनश्री वर्मा सोबत च्या डिव्होर्स नंतर RJ महवश सोबत पाहिल्यावर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

Indian cricketer पडलाय पुन्हा प्रेमात?
Indian cricketer पडलाय पुन्हा प्रेमात?

Indian cricketer yuzvendra chahal ex wife dhanashree varma…

Indian cricketer yuzvendra chahal ex wife dhanashree varma…

धनश्री वर्मा ही युझवेंद्र चहल ची एक्स वाइफ आहे. धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल हे दोघे कोविड १९ च्या लॉकडाउन मध्ये एकत्र आले. युझवेंद्र चहल ने धनश्री वर्मा चे डान्स व्हिडिओ ऑनलाइन पाहिले आणि डान्स क्लास साठी धनश्री वर्मा सोबत संपर्क केला. आणि डान्स क्लास च्या सोबतच त्या दोघांची लव स्टोरी सुरू झाली होती. काही दिवसातच युझवेंद्र चहल ने धनश्री वर्मा ला प्रपोस केले.त्यानंतर 8 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी इंगेजमेंट केल्याचे अनाउन्स केले आणि पुढच्या पाच महिन्यात तर त्यांनी लग्नही केले. 22 डिसेंबर 2020 ला ते दोघे लग्न बंधनात अडकले. त्यानंतर 2022 मध्ये कोरिओग्राफर धनश्री वर्मा ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून चहल चे आडनाव काढून टाकले. त्यावरून फॅन्स ने ओळखून घेतले की युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा वेगळे झाले आहेत पण त्यांनी लगेच त्यांच्या वेगळ्या झाल्याच्या अफवाना ऑफिसियली सांगितले नाही आणि अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये दोघांनी डिव्होर्स घेतला. वेगळ होण्याचं कारण कम्पॅटिबिलिटी इश्यू असल्याचे सांगितले.

Indian cricketer yuzvendra chahal ex wife dhanashree varma…

कोण आहे ही RJ महवश

rj.mahvash
rj.mahvash

RJ महवश ही एक सुप्रसिद्ध युट्यूबर आणि रेडिओ जॉकी आहे. तसेच ती एक अभिनेत्री सुद्धा आहे. RJ महवश चे पूर्ण नाव महवश अमू असे आहे. तिचा जन्म २७ ऑक्टोबर १९९६ रोजी उत्तर प्रदेश मधील अलिगढ मध्ये झाला आहे. ती 29 वर्षाची आहे. तिला संवाद आणि कथाकथनाची आवड आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार ते टिंडर यासह अनेक ब्रँडसोबत तिने काम केले आहे. तिच्या ब्राईट पर्सनॅलिटी मुळे तिला ओळखले जाते. तिने तिची दोन पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. त्यांची नावे वँडरिंग सोल आणि द ब्लीडिंग हार्ट्स अशी आहेत. RJ महवश ची महिन्याला 2 लाख रुपये इन्कम आहे जी ती रेडिओ जॉकी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशी ही बरीचशी तिच्या उत्पन्नाची माध्यमे आहेत.एका अहवालांनुसार महवश अविवाहित आहे. तिची आई स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. महावशने तिचा स्वतःचा शो ‘Bold Or Bowled होस्ट केला होता ज्यामध्ये तिने रकुल प्रीत, बादशाह आणि अदा शर्मा सारख्या सेलिब्रिटींना प्रेम आणि सेक्ससारख्या खाजगी विषयांवर प्रश्न विचारले होते. २०२२ मध्ये, महवाशने अमेझॉन मिनी टीव्ही शो प्लेग्राउंड सीझन १ होस्ट केला. कॅरीमिनाटी, हर्ष बेनीवाल आणि आशिष चंचलानी सारखे प्रसिद्ध क्रिएटर्स देखील तिच्यासोबत काम करतात.

युझवेंद्र चहल आणि RJ महवश

खरंच युझवेंद्र चहल आणि RJ महवश मध्ये प्रेम संबंध आहेत की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. युझवेंद्र चहल आणि RJ महवश हे दोघे इंस्टाग्राम सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो ही करतात. 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफी च्या फायनल सामन्या मध्ये दोघे एकत्र दिसून आले आणि RJ महवश ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ते पाहून फॅन्स ने फक्त हा अंदाज लावला आहे की ते एकमेकांना डेट करत आहेत पण ह्यावर अजूनही दोघांकडून कोणतीही ऑफिसिअल अनाउन्समेंट झालेली नाही.

जाणुया Rj महवाश चे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम फॉलोअर्स

महावश याच नावाचे तिचे एक यूट्यूब चॅनेल आहे, ज्याचे ८२८ हजार सबस्क्राइबर आहेत. तिने आतापर्यंत सुमारे १८९ व्हिडिओ पोस्ट केलेआहेत. तिला इंस्टाग्रामवर १.७ मिलियन लोक फॉलो करतात.

अश्याच मनोरंजन विश्‍वातील आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.

Leave a Comment