kawasaki z900 bike 2025: कावासाकी झेड ९०० लवकरच बाजारात दाखल होणार जाणुन घेवुयात तिचे दमदार नवीन फीचर्स, लुक आणि किमंत काय आहे ते?

kawasaki z900 bike 2025

ऑटोमोबाइल डेस्क पुणे- सुपर स्पोर्टस बाईक्स आणि राइडिंग च्या दुनियेवर राज्य करणारी एक सुपर बाईक कावासाकी झेड ९०० ह्या लोकप्रिय ब्रँड बाईक चे नवीन Model लवकरच बाजारात दाखल होणार आहे. कावासाकी झेड ९०० च्या नवीन Model अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन कावासाकी झेड ९०० लाँच करून, मोटरसायकल प्रेमींसाठी अनेक नवीन फीचर चा आनंद घेता येईल कारण ह्या नवीन बाईक मध्ये खूप सारे New features Assemble केले आहे म्हणुनच kawasaki z900 ही बाईक 2025 मध्ये पुन्हा एकदा नवीन फीचर्स आणि दमदार इंजिनसह व स्पोर्ट लूक लॉन्च होणार आहे.
kawasaki z900 bike 2025 image source acko drive

kawasaki z900 2025 : नवीन लूक आणि डिजाइन

2025 च्या मॉडेलमध्ये, kawasaki z900 च्या डिझाइनमध्ये बदल केले आहेत. बाईकला नवीन एलईडी हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर देण्यात आले आहेत. इंधनाची टाकी आणि बॉडी पॅनेलमध्येही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे बाईक अधिक स्पोर्टी दिसते. नवीन रंगसंगती देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे तिला अधिक सुंदर अणि आक्रमक रूप मिळाले आहे.
kawasaki z900 bike 2025 image source acko drive

kawasaki z900 2025 : शक्तिशाली इंजिन आणि कार्यक्षमता

kawasaki z900 bike 2025 image source acko drive

यावेळी kawasaki z900 पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली इंजिनसह सादर केली जाईल. यात शक्तिशाली 948cc इनलाइन-फोर इंजिन असेल, हे इंजिन 125hp पॉवर आणि 98.6Nm टॉर्क जनरेट करते जे 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याचे स्मुद आणि कंपन-मुक्त कार्यप्रदर्शन पाहायला मिळते. याशिवाय या बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस सिस्टीम देण्यात आली आहे. नवीन 6-अक्ष इनर्शियल मेजरमेंट युनिट (IMU) देण्यात आले आहे, ट्रॅक्शन कंट्रोल ,पॉवर मोड्स,चांगले सस्पेंशन,चांगले टायर्स,मजबूत फ्रेम, kawasaki कंपनी रायडर्सच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते ज्यामुळे सुरक्षितता आणखी वाढेल. प्रणाली मुळे निश्चितच ही एक शानदार आणि शक्तिशाली बाईक ठरणार आहे.

kawasaki z900: त्याची प्रीमियम तंत्रज्ञान वैशिष्ट्ये जाणून घ्या

kawasaki z900 bike 2025 image source acko drive

2025 च्या Z900 मध्ये 4.3-इंच टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. राईडोलॉजी द ॲप द्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राईड मोड्स सारखी इलेक्ट्रॉनिक रायडर एड्स देण्यात आली आहेत. 6-अक्ष इनर्शियल मेजरमेंट युनिट (IMU) देण्यात आले आहे.अपडेटेड ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे., ज्यामुळे ते Modern तर होईलच पण त्याची उपयुक्तताही वाढेल. या बाइकमध्ये तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीडोमीटर, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर सारख्या सुविधा मिळतील. याशिवाय, एक मोबाइल चार्जिंग पोर्ट देखील लावण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्ही प्रवासादरम्यान तुमचा फोन सहज चार्ज करू शकाल.

kawasaki z900 : सुरक्षा वैशिष्ट्ये जाणून घ्या

kawasaki z900 bike 2025 image source acko drive

नवीन kawasaki z900 मध्ये डिस्क ब्रेक आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आली आहे. ही वैशिष्ट्ये केवळ सुरक्षितता वाढवत नाहीत तर कठीण परिस्थितीतही चांगले नियंत्रण देतात. क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राईड मोड्स सारखी इलेक्ट्रॉनिक रायडर एड्स देण्यात आली आहेत. त्याच बरोबर यात लावलेला रुंद टायर जो चांगली पकड देतो. आणि ब्रेकिंग सिस्टममध्ये सुद्धा द्रुत प्रतिसाद मिळतो. याचे फ्रेम मजबूत (चेसिस )डिझाइन हे देखील बाईकला उत्तम आणि दीर्घकाळ सुरक्षा प्रदान करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

kawasaki z900 :आराम आणि सस्पेंशन सिस्टम

या बाईकमध्ये ऍडजस्टेबल सस्पेन्शन दिलेले आहे. ज्यामुळे रायडर्स त्यांच्या गरजेनुसार सस्पेन्शन बदलू शकतील. जे खराब रस्त्यावरही आरामदायी राइडिंगचा अनुभव देतात. सीट आणि आरामदायी राइडिंग पोझिशन लांबच्या प्रवासासाठी योग्य आहेत.

kawasaki z900 2025 : मायलेज आणि किंमत

kawasaki z900 bike 2025 image source acko drive

आता मायलेजबद्दल बोलायचे झाले तर नवीन kawasaki z900 1 लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 15-18 kmpl किलोमीटरचे मायलेज देईल. त्याच वेळी, कंपनीकडून किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु काही इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक एप्रिल मध्ये लॉन्च केली जाईल. काही अफवांनुसार, त्याची सुरुवातीची किंमत सुमारे ₹९,६०,००० रुपयांपर्यंत असू शकते.

kawasaki z900 2025 ची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

kawasaki z900 bike 2025 image source acko drive
  • आकर्षक डिझाइन ९४८ सीसी इंजिन
  • १२५ पीएस पॉवर आणि ९८.६ एनएम टॉर्क
  • ६-स्पीड गिअरबॉक्स
  • एलईडी हेडलॅम्प
  • डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर
  • ट्रॅक्शन कंट्रोल
  • अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस)
  • क्विक शिफ्टर

kawasaki z900 च्या नवीन आवृत्तीमुळे भारतीय बाजारपेठेत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. आणि ह्या बाईकचा चाहतावर्ग देखील खूप मोठा असल्याने ही बाईक बाजारपेठेत येण्याची अनेकांना उत्सुकता वाढली आहे.

अश्याच ऑटोमोबाइल आणि इतर क्षेत्रातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.

Leave a Comment