Oppo F29 Pro आणि Oppo F29 5G लॉन्चिंग – ह्या लॉन्चिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे Oppo ppo f29 5g फोन मोफत जिंकण्याची संधी सोबतच Oppo enco buds2 हे इयरबर्ड्स आणि 80 W power adepter चार्जर ही मोफत जिंकण्याची संधी….
Oppo F29 Pro आणि Oppo F29 5G लॉन्चिंग

टेक्नोलॉजी डेस्क पुणे- स्मार्टफोन ट्रेडिंग युगात अनेक स्मार्टफोन कंपन्या मोठ्या शर्यतीत आहेत. आणि यासह त्यांचे स्वतःचे वापरकर्ते देखील आहेत. त्यातच आणखी एक मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo भारतात स्वत:ची खूप चांगली आणि मोठा ग्राहकवर्ग असलेली बाजारपेठ निर्माण करून आहे. अनेक मोबाईल फोन ब्रँड बाजारात नवीन स्मार्टफोन्स यशस्वीपणे लाँच करत असतानाच. Oppo ही गेल्या वर्षीच्या F27 मालिकेतील यशानंतर Oppo आपला F29 हा सर्वोत्तम फीचर स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Oppo ने बुधवारी (12 मार्च 2025) भारतात 20 मार्च रोजी F29 मालिका लॉन्च करण्याची घोषणा केली. Oppo ह्या चीनी स्मार्टफोन कंपनीने सांगितले आहे की Oppo F29 मालिकेत 360° आर्मर बॉडी, उत्कृष्ट वॉटरप्रूफिंग आणि 14+ मिलिट्री दर्जाच्या पर्यावरणीय चाचण्यांचे प्रमाणपत्र असेल. जो की भारतातील सर्वात कठीण पर्यावरणीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की फोन कठोर टिकाऊपणा मानकांची पूर्तता करतो त्याच बरोबर भारतातील SGS च्या चाचण्यांनुसार यामध्ये IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह प्रमाणित करण्यात आले आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्याला अत्यंत प्रतिरोधक बनतात. चला तर मग जाणून घेऊया याचे जबरदस्त फीचर्स

Oppo F29 सिरीजमध्ये Oppo F29 Pro आणि Oppo F29 असे दोन स्मार्टफोन असतील.

Oppo F29 Pro आणि F29 डिझाइन आणि बिल्डक्वालिटी
डिझाइनच्या दृष्टीने, Oppo F29 सिरीज ला कंपनी ने “दमदार चॅम्पियन” म्हंटले आहे. हा फोन अत्यधिक सुंदर आणि हलकी असुन, सुमारे 180 ग्रॅम वजनाचा आणि फक्त 7.55 मिमी जाड असल्याचे सांगितले जाते. याच्या प्रो व्हेरिएंटमध्ये 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह एक मोठी 6,000mAh बॅटरी असेल. या मालिकेत पाण्याखाली फोटो काढण्याची सुविधा आहे. इथे Oppo ने 300 टक्के नेटवर्क वाढीची माहिती दिली आहे, ज्याचा उद्देश आव्हानात्मक भागात कनेक्टिव्हिटी सुधारणे हा आहे. यामध्ये IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह प्रमाणित करण्यात आले आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्याला अत्यंत प्रतिरोधक बनतात.

Oppo F29 Pro आणि F29 डिस्प्ले आणि कॅमेरा आणि स्टोरेज
ओप्पो F29 प्रो आणि F29 या दोन्हीमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच AMOLED डिस्प्ले वापरला जाईल, असे सांगण्यात आले आहे कंपनीने सांगितले की, स्मार्टफोनवरील लेन्स प्रोटेक्शन रिंग, मजबूत काचेपासून बनलेली असून, कॅमेरा लेन्सवर स्क्रॅच येऊ नयेत यासाठी ती कॅमेरा लेन्सपेक्षा जास्त उंच आहे.हा फोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB रॅम आणि स्टोरेज प्रकारांमध्ये मिळण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

Oppo F29 Pro आणि F29 Colours
Oppo F29 5G हा फोन ग्लेशियर ब्लू (Glacier Blue) आणि सॉलिड पर्पल (Solid Purple) रंगांमध्ये उपलब्ध असेल. तर प्रो व्हेरिएंट ग्रॅनाइट ब्लॅक (Granite Black) आणि मार्बल व्हाइट (Marble White) रंगात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Oppo F29 Pro आणि F29 प्रोसेसर्
Oppo F29 मध्ये MediaTek Dimensity 7300 SoC सह LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 अंतर्गत स्टोरेज सपोर्ट मिळेल, अशी अपेक्षा आहे. याची फ्रेमएरोस्पेस-ग्रेड ॲल्युमिनियम मिश्रधातूमध्ये अपग्रेड करण्यात आली शक्यता आहे

Oppo F29 Pro आणि F29 लॉन्चिंग ची तारीख
भारतात 20 मार्च रोजी F29 मालिका लॉन्च केली जाणार आहे.

Oppo F29 Pro आणि F29 किंमत आणि ऑफर
काही सोशल मीडिया सूत्रांकडून असे समजले आहे की Oppo F29 प्रो 5G ची किंमत भारतात 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. ह्या फोन च्या लॉन्चिंगच्या दिवशी Oppo एक्सचेंज ऑफर उघडणार आहे आणि तेंव्हाच तुम्हाला तुमच्या जुन्या फोनची एक्स्चेंज किंमत (व्हॅल्यू) समजणार आहे. तसेच Oppo ऑफर करत आहे Oppo f29 5g फोन, Oppo enco buds2 हे इयरबर्ड्स आणि 80 W power adepter चार्जर मोफत जिंकण्याची संधी ज्याची माहिती Oppo ने त्याच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

Oppo F29 Pro आणि F29 उपलब्धता:
हे फोन ओप्पो इंडिया ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असतील. आणि Amazon, Flipkart मिळण्याची देखील खुप जास्त शक्यता आहे.
टीप – स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमतीमध्ये लाँचच्या वेळी बदल असू शकतात. तुम्ही Oppo च्या अधिकृत वेबसाईट वरून ही माहिती पडताळून पाहू शकता. मला आशा आहे की आता तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल.
अश्याच टेक्नॉलॉजी संबंधित आणि इतर बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.