Salaman khan’s Sikandar movie बहुचर्चित ‘सिकंदर ‘ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बहुचर्चित ‘सिकंदर ‘ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2025 मध्ये रिलीज होणार सलमान खानची नवीन मूवी ह्या वर्षातली ही दुसरी हिट मूवी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या बॉलीवूड च्या छावा मूवी ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. छावा हा चित्रपट फक्त हिंदीतच नव्हे तर आणखीही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. अजूनही छावा मूवी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहे. सिकंदर चित्रपटही असाच सुपरहीट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Salaman khan’s Sikandar movie
ह्या नवीन वर्षातली सलमान खानची ही पहिलीच मूवी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये रिलीज झालेल्या ‘सिंघम अगेन’ मध्ये सुद्धा सलमान खानची दबाग लुक ची एन्ट्री असल्याचे सांगितले जात होते त्यामुळे सलमान खान खूप चर्चेत होता. प्रेक्षकांची आतुरता वाढली होती पण त्या मूवी मध्ये सलमान खानची शेवटी छोटीशी भूमिका केली होती सूत्रांच्या माहितीनुसार सिंघम मूवी च्या नेक्स्ट पार्ट मध्ये सलमान खान असण्याची शक्यता आहे. तसेच बेबी जॉन मूवी मध्येही सलमान खानने छोटीशी भूमिका साकारली आहे.’सिंघम अगेन’ आणि ‘बेबी जॉन ‘ ह्या मूवी सोडल्या तर सलमान खान ची ह्या दोन वर्षातली ही पहिलीच लीड रोल असलेली मूवी आहे.
सिकंदर मूवी मध्ये सलमान खान सोबत लीड रोल मध्ये (हिरोईन म्हणून) रश्मीला मंदना

सिकंदर मूवी मध्ये सलमान खान सोबत लीड रोल मध्ये (हिरोईन म्हणून) रश्मीला मंदना दिसून येणार आहे. रश्मीला मंदना साऊथ इंडिया मध्ये तर सुपरहिट मूवी केल्याचं आहेत पण आता बॉलीवूड मधलीही टॉप ची अभिनेत्री बनली आहे रश्मिकाने आता पर्यंत ‘ॲनिमल ‘ मिशन मजनू ‘ सारख्या अनेक बॉलिवूड मूवी मध्ये काम केले आहे. तसेच ह्या एका वर्षात रश्मिकाचा हा दुसरा सुपरहिट सिनेमा ठरू शकतो. रश्मिकाचा ह्याच वर्षी ‘छावा ‘ हा सिनेमा सुद्धा प्रदर्शित झाला आहे आणि तो सुपरहिट सुद्धा ठरला आहे.
रश्मिका सोबतच सिकंदर मध्ये दिसणार काजल अग्रवाल
रश्मिका सोबतच सिकंदर मूवी मध्ये साऊथ आणि बॉलीवूड ची आणखी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री दिसून येणार आहे ती दुसरी कोणी नसून काजल अग्रवाल आहे. काजल ने सुद्धा बॉलीवूड मध्ये ‘दो लफ्जो मैं कहा ‘ ‘सिंघम’ सारख्या बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे.

सिकंदर मूवी चे ए. आर. मुर्गदोस डायरेक्टर आहेत. सिकंदर मूवी मध्ये सुनील शेट्टी, सत्यराज, प्रतीक बब्बर, शर्मन जोशी, चैतन्य चौधरी, नवाब शाह सारखे आणखी मोठे मोठे स्टार दिसून येणार आहेत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की बाहुबली सिनेमा मध्ये कटप्पा ची भूमिका साकारणारे सत्यराज सिकंदर मूवी मध्ये विलन ची भूमिका साकारणार आहेत आणि प्रतीक बब्बर हा त्यांचा मुलगा असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या तरी अस म्हटलं जात आहे की बॉलीवूड मध्ये रिमेक मूवी बनल्या जात आहेत सिकंदर मूवी ही सुद्धा साऊथच्या एका मूवीचा रिमेक आहे अस म्हटलं जातं आहे. पण मूवी पहिल्या शिवाय ही ठरवणं चुकीच आहे की ही मूवी रिमेक आहे की नाही. फिल्म चे डायरेक्ट म्हणतात की मूवी खूप ऍक्शन ने भरलेली आहे.
सिकंदर मूवीच पहिलं गाण ‘जोहरा जबी ‘ हे रिलीज
सिकंदर मूवी चा फस्ट लुक टीझर हा साजिद नाडियावाला ह्यांच्या बर्थडेच्या दिवशी फेब्रुवारी मध्ये रिलीज करण्यात आला होता आणि आत्ताच ४ मार्च रोजी सिकंदर मूवीच पहिलं गाण ‘जोहरा जबी ‘ हे रिलीज करण्यात आलं आहे. सिकंदर मूवी मधलं हे गाणं प्रेक्षकांना खूपच आवडलं आहे.२८ मार्च रोजी सिकंदर ही मूवी रिलीज करण्यात येणार आहे. सलमान खानच्या बहुतांश मूवी ह्या ईद रोजी रिलीज होतात ह्या वेळी ही ईद च्या दिवशीच सिकंदर मूवी रिलीज करण्यात येणार आहे.
अश्याच मनोरंजन आणि इतर विषयातील बातम्यांसाठी आपल्या प्रभात न्यूज इंडिया या डिजिटल न्यूज पेज हॅन्डलला आवश्य भेट देत रहा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणे करून नवीन घडामोडी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.