Tips to keep your face healthy even in summer ह्या ५ टिप्स फॉलो करा उन्हाळ्यातही तुमचा चेहरा राहील तेजस्वी आणि तरोताजा…

हेल्थ डेस्क पुणे: आता उन्हाळा आला म्हटल्यावर सगळ्यात जास्त काळजी चेहऱ्याची वाटते कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरातली उष्णता वाढते ज्यामुळे आपला चेहरा सुखतो आणि चेहऱ्यावरचे तेजही कमी होऊन जाते. उन्हाच्या झळा लागल्या मुळे चेहरा काळपटही पडतो आणि अती प्रमाणात उष्णते मुळे चेहऱ्याची जळजळही होते. उन्हापासून चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर खाली दिलेले उपाय नक्की करून पाहा अतिशय सोपे आणि कमी वेळात तुमच्या चेहऱ्याच्या समस्या दूर होऊ शकतात. तर जाणून घेऊया उन्हाळ्यात आपण आपल्या चेहऱ्यासाठी कोण कोणते उपाय करू शकतो
चेहऱ्यावरील काळपटपणा ,चेहरा सुखणे/ चेहऱ्याची तेजी कमी होने, चेहऱ्यावर बारीक फोड (मूरम्या) येणे अश्या अनेक प्रकारच्या समस्यावर उपाय
१ . चेहर्यावर लावा घरी तयार करून नैसर्गिक आयुर्वेदिक लेप

कोणताही ऋतू असला तरीही आपण काही घरातून बाहेर पडणं टाळत नाही आणि बाकीच्या ऋतू पेक्षा अधिक उन्हाळ्यात चेहरा काळा पडतो आपला चेहरा जास्त प्रमाणात काळा पडू नये यासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्याला एक लेप लावावा एका वाटी मध्ये थोडेसे बेसन पीठ (चण्याच्या डाळीचे पीठ) घ्यावे त्यानंतर त्यात थोडी आंबे हळद घालावी, थोडस मध घालावे आणि कच्चे दूध घालून चांगलं एकजीव करून घ्या आणि ते मिश्रण (लेप)तुमच्या चेहऱ्यावर लावा त्याने तुमचा चेहऱ्यावरील काळपटपणा (tanning) निघून जाईल एवढाच नाही तर चेहऱ्यावरील डाग सुद्धा कमी होतील हे नक्की करून पाहा.
२ . एलोवेरा (कोरफड) आणि मध साबणा ऐवजी चेहर्यावर लावा

उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्यावरील तेज कमी होऊन जाते त्यासाठी आपण एलोवेरा घेऊन त्याचा आतील चिकट भाग (गर) हा काढून घ्यायचा आणि तो हाताने किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा त्यानंतर त्यात थोडे मध घालावे आणि ते चेहऱ्याला लावावे. त्याने सुद्धा चेहरा खुलतो. शक्यतो उन्हाळ्यात साबणाचा वापर हा कमी प्रमाणात करावा कारण साबण हा चेहऱ्याला काही प्रमाणात ड्राय करतो म्हणून त्याचा जास्त परिणाम हा उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात दिसून येतो.
३ . लिंबु आणि इतर आयुर्वेदिक मिश्रण मदत करतील तुमचा चेहरा निरोगी ठेवण्यासाठी

उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्यावर बारीक फोड येतात त्यांना मूरम्या अस म्हटलं जात ते घालवण्यासाठी आठवड्यातून २/३ वेळा चेहऱ्यावर लिंबू लावा लिंबणे चेहऱ्यावरील डाग पिंपल्स कमी होण्यास मदत होते. पण फक्त लिंबू आपण आपल्या चेहऱ्यावर लावायचे नाही त्यासाठी हातावर थोडस मध घ्या त्यामध्ये ३ किंवा ४ थेंब लिंबाचे टाका आणि ते एकत्र करून चेहऱ्याला मसाज करा आणि ते २० ते ३० मिनिटे तसेच चेहऱ्याला लाऊन ठेवा नंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवून टाका. हे सुद्धा आपल्या चेहऱ्याला खूप फायदेशीर ठरते. अजून एक उपाय म्हणजे आपण रोज झोपताना नाईट क्रीम लावून झोपावे त्यासाठी थोडासी अलॉवेरा जेल घ्या त्यामध्ये थोडस ग्लिसरीन टाका आणि गुलाब जल किंवा कच्चे दूध वापरून ते मिश्रण रात्रीचे झोपताना लावावे. त्यानेही चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.
४ . उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खा ताजी फळे आणि ठेवा उत्तम आहार

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ताजी फळे आणि पालेभाज्या खाव्या त्यामुळे आपले शरीर आतून सुद्धा चांगले राहते आणि चेहऱ्यावर चे तेज वाढते आणि त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
५ . भरपूर पाणी प्या ज्युस प्या शरीराला ठेवा हायड्रेटेड

उन्हाळा म्हटलं तर सर्वात जास्त प्रमाणात गरज पडते ती म्हणजे पाण्याची जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली तर आपल्या चेहऱ्यावरचे तेज कमी होऊन जाते. आपला चेहरा हा फुलासारखा असतो फुलाला जर झाडा पासून तोडले तर ते काही क्षणातच कोमेजून जाते तशीच आपली त्वचाही काही क्षणातच कोमेजून जाते म्हणून उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.
काही इतर टिप्स: |
1. दररोज योगा करण्यासाठी वेळ काढा प्रयत्न करा. |
2. दररोज व्यायाम करण्यासाठी वेळ काढा प्रयत्न करा. |
3. कुठल्याही गोष्टीचा जास्त ताण तणाव घेऊ नका शक्य तेवढा ताण तणाव टाळा |
4. चांगले विचार वाचन करा किंवा वेळ काढून तुम्हाला जे आवडत ते करण्याचा प्रयत्न करा |